गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मार्च 2020 (14:03 IST)

बँकांच्या कामकाजाची वेळ कमी करण्यात येणार : बँकेतील काम लवकरात लवकर उरका

bank time
कोरोना व्हायरसमुळे देशातील अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. देशातील अर्थव्यवस्था ढासळू लागली आहे. कोलमडणारी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आणि देशातील कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून लवकरच मोठी पावलं उचलली जाणार आहेत. लवकरच बँकांच्या कामकाजाची वेळ कमी करण्यात येणार आहे म्हणजेच सामान्यांसाठी बँकेची वेळ कमी करण्यात येणार आहे.
 
त्याचप्रमाणे कोरोनामुळे प्रभावित क्षेत्रांसाठी NPA चे नियम व अटी शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. याकरता 30 ते 60 दिवसांचा कालावधी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रस्तावावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया  आणि  सरकारमध्ये चर्चा सुरु आहे.
 
अर्थ मंत्रालयाने बँकांना Business Continuity Plan बनवण्यास सांगितले आहे. अधिक महत्त्वाच्या कामांसाठी बँकांची वेगवेगळी टीम बनवण्यात येऊ शकते. कामकाजाची वेळ मुख्यत: कमी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे NPA मध्ये शिथिलता मिळण्याबाबत अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग डिपार्टमेंटने (bank time) प्रस्ताव मांडला आहे. अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय यांच्यामध्ये या निर्णयाबाबत एकमत झाले आहे. सुरूवातीला MSME, ऑटो, टूर अँड ट्रॅव्हल्स, हॉटेल्स आणि एव्हिएशन सेक्टर्सचा विचार करण्यात येणार आहे.