मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मार्च 2020 (10:26 IST)

सॅनिटायझरची किंमत वाढणार नाही, सरकारचा निर्णय

कोरोना व्हायरसमुळे सॅनिटायझरचा काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सॅनिटायझरची मागणी भविष्यात आणखी मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक ठिकाणी साठेबाजी केली जात असल्याचे प्रकारही उघड झाले आहेत. त्यामुळे सरकारनं त्याची दखल घेत सॅनिटायझरची किंमत वाढवण्यास मज्जाव केला आहे.
 
केंद्राच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयानं सॅनिटायझरची किंमत वाढणार नाहीत असा आदेश काढला असून सॅनिटायझर स्वस्त उपलब्ध करून देण्याबाबत पावलं उचलली आहेत. देशात सॅनिटायझर ५ मार्चला ज्या किंमतीमध्ये उपलब्ध होते तीच किंमत पुढचे काही महिने कायम राहणार आहे.
 
सॅनिटायझर ५ मार्चला असलेल्या किंमतीतच ३० जूनपर्यंत कायम ठेवण्याचा आदेश केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयानं काढला आहे. या आदेशामुळे लोकांना सॅनिटायझर माफक दरात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.