CoronaVirus : सर्व स्पर्धा रद्द, बीसीसीआयचा मोठा निर्णय

bcci
नवी दिल्ली| Last Modified रविवार, 15 मार्च 2020 (12:10 IST)
कोरोना विषाणुच्या धसक्याने बीसीसआयने सर्व स्पर्धा रद्द केल्या आहेत. खेळाडू आणि चाहत्यांचा विचार करून आम्ही सर्वच स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
रणजी करंडक स्पर्धेची शुक्रवारी अंतिम फेरी खेळवण्यात आली. पण आता या स्पर्धेनंतर एकही स्पर्धा न भरवण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे. त्यामुळे आजपासून बीसीसीआयच्या अंतर्गत कोणत्याही स्थानिक स्पर्धा खेळवण्यात येणार नाहीत. कोरोना व्हायरसमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेबरोबरची मालिका शुक्रवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. तोपर्यंत जर कोरोना व्हायरसचा प्रसार थांबला नाही, तर आयपीएलही रद्द करण्यात येऊ शकते. पण सध्याच्या घडीला इराणी ट्रॉफी आणि विजय हजारे करंडक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली
जर स्पर्धा रद्द झाल्या तर भारतीय क्रिकेटपटूंचे पगार कापण्यात येतील, असे वक्तव्य भारतीय ...

रिटायरमेंट या शब्दामुळे चिडतो माही

रिटायरमेंट या शब्दामुळे चिडतो माही
महेंद्र सिंह धोनी निवृत्ती कधी घेणार यावर अनेकदा चर्चा सुरु असते. कारण इंग्लंडमध्ये पार ...

जडेजच्या पत्नीने केली 21 लाखांची मदत

जडेजच्या पत्नीने केली 21 लाखांची मदत
कोरोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला ...

क्रिकेटपटू स्मृती मंधाना होमक्वारंटाइनमध्ये

क्रिकेटपटू स्मृती मंधाना होमक्वारंटाइनमध्ये
भारतीय महिला क्रिकेट संघात सलामीला फलंदाजीसाठी येणारी स्मृती मंधानाला तिच्या सांगलीतील ...

खोट्या बातम्या देणे थांबवा, संतापली धोनीची पत्नी

खोट्या बातम्या देणे थांबवा, संतापली धोनीची पत्नी
भारताचा माजी कर्णधार आणि सर्वांचा लाडका क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी ...