शनिवार, 12 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 14 मार्च 2020 (17:40 IST)

CORONA : मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, निवडणुकाही पुढे ढकलण्याची मागणी

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस (MNS Gudipadva melva Cancelled) वाढतं आहे. यामुळे जनतेने गर्दीची ठिकाण टाळा असे आवाहन सरकारकडून केलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकृत पत्राद्वारे सर्व मनसैनिकांना याबाबतची माहिती दिली.
 
दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने (MNS Gudipadva melva Cancelled) मुंबईत शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्यासाठी मुंबईसह राज्यातून मोठ्या संख्येने मनसैनिक शिवतीर्थावर येतात. मात्र कोरोनाची साथ जास्त पसरु नये, तसेच कोरोना आटोक्यात येण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी गुढीपाडव्याचा मेळावा रद्द केला आहे. राज्यातील नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षितता या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.