1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By

मनसेचा आज १४ वा वर्धापन दिन

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र नव निर्माण सेने’चा १४ वर्धापन सोमवारी अर्थात आज मुंबईतील विष्णुदास भावे नाटय़गृहात आयोजित करण्यात आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे या वेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून महाविकास आघाडी सरकारच्या शंभर दिवसांवर राज काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
 
एकीकडे शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीशी युती करत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या झेंडय़ाचा रंग बदलला असून हिंदुत्वाचा मुद्दा आघाडीला आणण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईत होऊ घातलेली महापालिका निवडणूकही या वेळी रंगणार असून मनसे या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी मनसेचा वर्धापनदिन नवी मुंबईत साजरा करण्यात येत असून या वेळी राज्य सरकारच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी मनसेच्या श्ॉडो कॅबिनेटची घोषणा राज ठाकरे करतील असेही सूत्रांनी सांगितले.