1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मार्च 2020 (11:01 IST)

छत्रपती शिवाजी महाराजांच नाव शौचालयाला???

भाजपाच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाचा दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्विटवरुन नाराजी व्यक्त केली आहे. 
 
“ही लोक डोक्यावर पडली आहेत का ?छत्रपती शिवाजी महाराजांच नाव शौचालयाला?,” असा सवाल देशपांडे यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे.
 
घडलेला प्रकार असा आहे की भाजपाचे मुंबईतील आमदार प्रसाद लाड यांनी 4 मार्च रोजी एक ट्विट करुन एका उद्घाटन सोहळ्याची माहिती दिली होती. आपल्या मतदारसंघामध्ये लाड यांनी शौचालयाचे उद्घाटन केल्याचे सांगितलं होतं. मात्र या शौचालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भाजपाने दिल्याचा आरोप करत मनसेने भाजपावर टीका केली आहे.
 
देशपांडे यांच्या टीकेनंतर लाड यांनी आपले ट्विट डिलीट केलं आहे. या उद्घाटन समारंभाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते आणि त्यांच्या हस्तेच छत्रपती शिवाजी महाराज बहुउददेशीय केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडल्याचे नमूद करण्यात आलं आहे. मनसेच्या टीकेवर भाजपा समर्थकांनी स्पष्टीकरण देत म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बहुउददेशीय केंद्राला देण्यात आले आहे, शौचालयाला नाही.
या कार्यक्रमात भाजपा आमदार आशिष शेलार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार कालिदास कोळमकर आणि भाजपा नेते तमिल सेलवन हे ही उपस्थित होते.