मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 15 मार्च 2020 (11:20 IST)

महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या 31

राज्यातल्या करोनाग्रस्तांची संख्या 31 वर गेली आहे. देशभरात करोनाचे 85 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. मात्र एकट्या महाराष्ट्रात हा आकडा 31 वर गेला आहे.
 
पिंपरी चिंचवडमधले पाच रुग्ण आढळळे आहेत. यापैकी चारजण दुबईतून आले आहेत. तर एकजण थायलँडहून आला आहे असंही समजलं आहे. या पाचजणांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
 
हे संकट टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यकता असेल तरच बाहेर पडा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्रात खबरदारीचा उपाय म्हणून मॉल्स, शाळा, महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.