प्रियंका चतुर्वेदींना शिवसेनेनेकडून उमेदवारी
यंदा शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांच्यापैकी एकाला राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू होती. हे दोन्ही नेते पक्षाचे निष्ठावंत असल्यामुळे त्यांच्यापैकीच एकाला उमेदवारी मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्या दोघांना डावलून अवघ्या काही महिन्यांपूर्वी म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेनेत दाखल झालेल्या आणि काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींना शिवसेनेने आपल्या कोट्यातली राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, आता शिवसेनेतील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.