'या' हॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्याला कोरोनाची लागण
हॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. 63 वर्षीय टॉम यांनी खुद्द सोशल मीडियावर ही माहिती दिली. टॉम आणि रिटा दोघेही शूटींगसाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. ऑस्ट्रेलियाहून परत आल्यानंतर त्यांना ताप, सर्दी ही लक्षणे दिसू लागली. त्यांनी कोरोनाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर टेस्ट पॉझिटीव्ह आली. टॉम हँक्स यांनी ट्विटरवरून त्यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.
टॉम यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केले. ‘ आम्ही दोघे ऑस्ट्रेलियाला गेले होतो, त्यानंतर आम्हाला ताप आला आणि अंगदुखी जाणवू लागली. आम्ही तात्काळ वेळ न घालवता कोरोना टेस्ट करून घेतली. त्यानंतर ती पॉझिटीव्ह निघाली. आता आम्ही कोरानासाठी तयार केलेल्या खास वॉर्डमध्ये आहोत. उपचार सुरु आहेत. निष्काळीपणा न करता काही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरकडे जा आणि टेस्ट करा असला सल्लाही त्यांनी दिलाय.