मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: जत , गुरूवार, 12 मार्च 2020 (14:31 IST)

शेतजमिनीच्या वादातून मुलाने केला आई-वडिलांसह बहिणीचा खून

शेतजमिनीच्या वादातून पोटच्या मुलानेच आई- वडिलांसह सख्ख्या बहिणीचा खून केल्याची घटना उदी (ता. जत) येथील पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर असलेल अरकेरी वस्तीवर घडली. 
 
शेतजमिनीच्या वादातून आई नागव्वा गुरलिंगाप्पा अरकेरी (वय 75), वडील गुरलिंगाप्पा अण्णाप्पा अरकेरी (वय 82) व बहीण समुद्राबाई शिवलिंगाप्पा बिराजदार (वय 62, सर्व रा. उमदी) यांचा दांडक्याने  डोक्यात गंभीर वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. सिध्दप्पा गुरूलिंगाप्पा अरकेरी (वय  58, रा. उमदी) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी हा पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला असून याबाबत उम दी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने जत तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरलिंगाप्पा अरकेरी यांची उमदी ते चडचण रस्त्यावर सहा एकर व जत रस्त्यावर बारा एकर अशी शेतजमीन होती. यापैकी चार एकर आरोपीच्या नावे आहे. आरोपी सिध्दप्पा हा आई- वडिलांचा सांभाळ करत नसल्याने तो गावातच स्वतंत्र राहात होता. बहीण समुद्राबाई बिराजदार हिचे सासर मंगळवेढा तालुक्यातील सोड्डी येथे आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर अनेक वर्षांपासून ती उमदी येथे आई-वडील यांच्यासोबत राहात होती.