सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मार्च 2020 (10:17 IST)

विद्या चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा, नातवाच्या जन्मासाठी केला छळ

राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातवाच्या जन्मासाठी सासरी छळ होत असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांच्या सूनेने केला आहे. 
 
विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत चव्हाण, मुलगा अजित (तक्रारदार सूनेचा पती) दुसरा मुलगा आनंद आणि शीतल अशा पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने आपला छळ करण्यात येत होता, असा दावाही सूनेने केला आहे.
 
तक्रारदार सूनेला पहिली मुलगी आहे. त्यात दुसरीही मुलगीच झाली. मात्र मुदतीआधीच प्रसुती झाल्याने बाळ दगावलं. त्यानंतर माझ्या छळात वाढ झाली, अशी तक्रार सूनेने दिल्याचं पोलिसांनी सांगितल.