मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 नोव्हेंबर 2019 (14:56 IST)

नाशिकमधील राष्ट्रवादीचे दोन आमदार अजितदादांबरोबर

राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित फुटीत जिल्ह्यातील आ. माणिकराव कोकाटे तसेच आ. दिलीप बनकर यांनी पक्षाचे गटनेते अजितदादा पवार यांचे पाठराखण केल्याचे स्पष्ट होत आहे.
 
राज्याच्या राजकीय पटलावर शनिवारी सकाळी नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भुमिका स्पष्ट केली तेव्हा बनकर व कोकाटे हे आमदारद्वयी त्यांच्यासमवेत दिसून आली. त्यामुळे एरवी शरद पवारांची पाठराखण करणाऱ्या नाशिक जिल्ह्याने आता अजित पवारांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला का, हे येत्या काही तासातच स्पष्ट होईल. या फूटीनंतर शरद पवार काय भूमिका घेतात यावर राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया मात्र अद्याप मिळू शकली नाही.