1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार

NCP MLA Bhaskar Jadhav
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली हे समोर आले आहे. त्यांनी जवळपास एक तास जाधव उद्धव ठाकरेंशी चर्चा केली असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच ही भेट असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली  आहे. सोबतच भास्कर जाधव हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतील, अशी सुत्रांची माहिती आहे. 
 
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत अनेक आमदार, कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. त्याचाच, भाग म्हणून विजयी होऊ शकणाऱ्यांना शिवबंधन बांधण्याचे काम शिवसेना वेगात करत आहेत. बार्शीचे राष्ट्रवादीचे आ. दिलीप सोपल आणि बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आ. विलास तरे यांना शिवबंधन बांधण्याचे निश्चित झाले तर शिवतारे यांनी शिवसेना प्रवेश केला आहे. तर राष्ट्रवादीचे आणखी दोन आमदारही सेनेच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादीचे आणखी दोन आमदार कोणते, त्यांची नावे अद्याप पुढे आली नाहीत. मात्र, राष्ट्रवादीचे कोकणातील नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे भास्कर जाधव हेही शिवबंधन हाती घेतील, अशी चर्चा रंगली आहे.