संबंधित माहिती
- राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे शिवसेनेत, वाचा काय आहे सत्य
- राष्ट्रवादीच्या रश्मी बागल, काँग्रेसच्या इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित शिवसेनेत प्रवेश
- राज ठाकरे यांची चौकशी नाही तर मनसे कार्यकर्ता चौगुले आत्महत्या करण्या मागचे हे आहे कारण
- दरोडे खोरांच्या गोळीबारात जीव गमावलेल्या सॅम्युअलच्या कुटुंबाला आर्थिक मदत, पत्नीस नोकरी
- लातूर पाणी पुरवठयात कपात सप्टेंबरपासून महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणी
भुजबळ शिवसेनेत परतणार, उद्धव यांचे सूचक वक्तव्य
राज्यातील निवडणुकांचे वातावरण तापले असून, अनेक मोठे नेते धक्का देत इतर पक्षात प्रवेश करत आहेत. देशात भाजपा तर राज्यात शिवसेनेत अनेक प्रवेश करत आहेत. त्यात आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे नाव सुध्दा चर्चेत असून ते पुन्हा त्यांच्या पक्ष शिवसेनेत जाणार अशी जोरदर चर्चा आहे. मात्र भुजबळांनी या चर्चा चुकीच्या असल्याचं म्हणत शिवसेना प्रवेशाचं वृत्त फेटाळलं.
दरम्यान, भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाबाबत खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारले त्यावर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचे उत्तर मिळेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळ पुन्हा शिवसेनेत परतणार का हा एकच प्रश्न शिवसैनिकांमध्ये चर्चिला जात आहे. जर भुजबळ यांची राष्ट्रवादी सोडली तर राज्यातील राजकारणात मोठे बदल होतील व राष्ट्रवादीला मोठा धक्का असणार आहे.
