1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (16:23 IST)

राष्ट्रवादीच्या रश्मी बागल, काँग्रेसच्या इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित शिवसेनेत प्रवेश

Rashmi Bagal of NCP
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापुरातील नेत्या रश्मी बागल आणि काँग्रेसच्या इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलं. निर्मला गावित यांनी काल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता यावेळेस  शिवसेना नेते सुभाष देसाई, संजय राउत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर राज्यमंत्री दादा भूसे, रविंद्र मिर्लेक़र, भाऊँ चौधरी उपस्थित होते. यावेळी रश्मी बागल म्हणाल्या की, राजकारणात महत्वकांक्षा असल्याशिवाय कुणी राहू शकत नाही. मी करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना पक्षनेतृत्वाकडे इच्छा व्यक्त केली आहे. नेतृत्व काय तो निर्णय घेईल.