बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (10:17 IST)

दरोडे खोरांच्या गोळीबारात जीव गमावलेल्या सॅम्युअलच्या कुटुंबाला आर्थिक मदत, पत्नीस नोकरी

नाशिकसिडको परिसरात दिवसा पडलेल्या सशस्त्र दरोड्यात आपल्या जीवाची पर्वा न करता दरोडेखोरांना थोपवून सायरन वाजवून पोलिसांना सतर्क करणाऱ्या, सोबत दरोडेखोरांनी झाडलेल्या गोळ्यामुंळे मृत्यू झालेल्य मुथूट फायनान्स कार्यालयाचा युवा अभियंता मुरियायिकारा साजू सॅम्युअलचा (२९, रा. मूळ केरळ) त्याच्या शौर्याची दखल घेत ‘मुथूट’ने सॅम्युअलच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली आहे. तर  सॅम्युअल यांची पत्नी जेस्सी यांना रूग्णालयात नोकरी दिली आहे. तर त्यांच्या बॅँक खात्यावर ३५ लाखांची मुदत ठेव ठेवली असून, सॅम्युअलच्या मासिक वेतनाची रक्कम दरमहा त्यांना मिळणार असल्याचे कंपनीचे उपमहाव्यवस्थापक संजीव आनंद यांनी पोलीस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले आहे.
 
पोलीस आयुक्तालयात ‘स्टार आॅफ द मंथ’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी संजीव आनंद उपस्थित होते. यावेळी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले, अमोल तांबे आदि उपस्थित होते. पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांच्या तपासी पथकाला यापुर्वी मिळालेले प्रत्येकी ७० हजार असे एकूण २ लाख १० हजार रुपयांच्या बक्षिसाची रक्कम पोलिसांनी सॅम्यूअल कुटुंबाला मदत म्हणून दिली आहे.