गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019 (15:49 IST)

शिवसेना ते राष्ट्रवादी परत पुन्हा शिवसेना महाले स्वगृही

दिंडोरीचे माजी आमदार आणि लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार धनजार महाले स्वगृही परतणार आहेत. धनराज महाले पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. महाले हे पूर्वी शिवसेनेत होते. ते शिवसेनेचे माजी आमदार आहेत. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. निवडणुकीच्या तोंडावर धनराज महाले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. हाती भगवा झेंडा घेऊन आणि शिवबंधन बांधून धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. धनराज महाले हे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार होते. मात्र त्यांनी आज अखेर शिवबंधन हाती बांधलं आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीला पुन्हा मोठा राजकीय धक्का बसला आहे. धनराज महाले हे माजी खासदार हरीभाऊ महाले यांचे पुत्र आहेत. 2009 साली ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते.  मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यंदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवार यांना तिकीट दिल्याने, धनराज महाले यांनी शिवसेना सोडली.