1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019 (15:45 IST)

पूर असताना सदाभाऊ खोत तुम्ही कुठे होता? – आ. जितेंद्र आव्हाड

Come on. Jitendra Awhad
राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर राजकारण करण्याचे काम सदाभाऊ खोत करत आहेत. खोत यांनी महापुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे भान न ठेवता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. पण पूर असताना सदाभाऊ तुम्ही कुठे हुंदडत होतात, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आमच्या पक्षाचे अध्यक्ष, ८० वर्षांचा तरूण पुराची पाहणी करण्यात व्यस्त आहे.

सांगली कोल्हापूर जिल्ह्यात तब्येतीची पर्वा न करता पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी फिरत आहे. त्यामुळे सदाभाऊंनी राजकारण न करता संकटग्रस्तांचे डोळे पुसण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे आव्हाड म्हणाले.