गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2019 (10:39 IST)

लातूरकर देखील करत आहेत पूरग्रस्त सांगलीला मदत

Laturkar is also assisting the flood-hit Sangli
सांगलीला भयंकर पुराने वेढले. यात त्यांची मोठी वाताहत झाली. माणुसकीचा हात पुढे करीत लातुरकरांनीही सांगली, कोल्हापुरच्या पुरग्रस्तांना जिवनावश्यक वस्तुंची मदत पाठवली. दोन ट्रक उपगोगी असलेले सामान सांगलीकडे रवाना झाले. आणखीही मद्त जमत आहे तीही लवकरच पाठवली जाणार आहे. लातुरच्या औसा मार्गावर मदत जमा करायला ही सगळी मंडळी जमली. त्यांनी ट्रकला रवाना केले अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक राहूल माकणीकर यांनी दिली. ईद या निमित्ताने मुस्लीम बांधवांनी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली, नमाज अदा केली. इदगाह मैदानावरील या प्रार्थनेनंतर ज्योती मानकरी या अपंग तरुणीने पुढाकार घेत पूरग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन केलं. त्याला जमलेल्या सर्वांनी मदत दिली. लातुरकरांनी आपल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला, माणुसकीकचं दर्शन घडवलं असं मानकरी सांगतात.