शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 ऑगस्ट 2019 (16:55 IST)

नियोजन चुकलं किंवा तांत्रिक चूक झाली असं म्हणता येणार नाही - गिरीश महाजन

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगली येथे पत्रकार परिषद घेऊन सध्यांच्या पूरपरिस्थितीची पूर्ण माहिती दिली आहे. अनेक वर्षात झाला नाही एव्हडा पाऊस  काही दिवसात पडला होता. त्यामुळे प्रशासनाचं नियोजन कुठे चुकले आहे. तांत्रिक चूक झाली असं म्हणता येणार नाही, ही नैसर्गिक आपत्ती आहे, असं गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या संकटाला सामोरे जातांना मनुष्यबळ कितीही लागूदे, गावं 5-6 दिवसात चकाचक झाली पाहिजे असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत, असं महाजन यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारच अधिक लक्ष हे आरोग्य यंत्रणेकडे आहे. पुरामुळे घाण रस्त्यावर आली आहे, त्यामुळे रोगराई पसरण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. या करीत अतिरिक्त डॉक्टर आणि औषधांची तयारी राज्य सरकारने केली असून, सांगली आणि कोल्हापूरमध्ये सर्वकाही पूर्वपदावर आणू असं गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. विरोधकांना विरोध करू द्या आम्ही आमचे काम पूर्ण करत आहोत, सरकार सर्वोतोपरी मदत करणार असून, सोशल मीडिया कडे दुर्लक्ष केलेले बरे असे त्यांनी सांगितले आहे.