शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 14 नोव्हेंबर 2019 (11:26 IST)

राष्ट्रवादीचे नऊ आमदार भाजपच्या संपर्कात : भाजप खासदार

राष्ट्रवादीचे 9 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केलं आहे.  
 
"काँग्रेस आणि शिवसेनेनं आपल्या आमदारांनी पक्षांतर करू नये म्हणून काळजी घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा घोडेबाजार होणार याची त्यांना भीती आहे. मात्र राष्ट्रवादीचे 9 आमदार आपल्या संपर्कात आहे," असं वक्तव्य निंबाळकर यांनी केलं आहे.
 
अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी निंबाळकर माढ्यात आले होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीबाबत हे विधान केलं.