शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (11:14 IST)

गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला

एल्गार परिषद खटल्यातील आरोपी गौतम नवलखा यांच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज पुण्याच्या विशेष न्यायालयाने फेटाळल्याची बातमी दिली आहे.
 
नवलखा आणि इतर 23 जणांवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुदत काल संपली. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
 
विशेष न्यायाधीश एस.आर. नवंदार यांनी हा निर्णय दिला आहे. गौतम नवलखा यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून ते माओवादी पक्षासाठी काम करत असल्याचा आरोप सरकारी पक्षाने लावला आहे.