लोणीकंद येथे अफू विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली
पुणे शहर गुन्हे शाखेने अफू विक्री करणाऱ्या एका इसमास अटक करून त्याच्याकडून 22 लाख 39 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 10 ऑक्टोबर 2025 रोजी लोणीकंद-वाघोली रोडवरील शिवरकर कॉम्प्लेक्स परिसरात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी गस्त घालताना लोणीकंद वाघोली रोड परिसरात एका व्यक्तीला काळ्या पिशवीसह संशयास्पद गस्त घालताना दिसले. पोलिसांनी जवळ जाताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.पण पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली.
संशयास्पद व्यक्तीची झडती घेतली असताना त्याच्याकडे 1 किलो हून अधिकचे अफू आढळून आले. जप्त अम्लीय पदार्थाची किंमत बाजारमूल्ये 22 लाख पेक्षा जास्त आहे. तसेच त्याच्याकडून दोन मोबाइलफोन एक काळी पिशवी असा एकूण 22 लाखाहून जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तुलसीदास किसनदास वैष्णव असे असून त्याच्या विरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 569/2025 भा.दं.वि. कलम 8(सी), 17(बी) अन्वये अंमली पदार्थ नियंत्रण कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी सांगितले की, पुणे शहरात अंमली पदार्थांची विक्री व वितरण रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Edited By - Priya Dixit