वैध कागदपत्रांशिवाय भारतात राहणाऱ्या 36 वर्षीय बांगलादेशी महिलेला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासात इतर बेकायदेशीर स्थलांतरितांचाही खुलासा झाला आहे.देवनार पोलिसांनी महिलेला अटक केली आहे आणि हद्दपारीची कारवाई सुरू केली आहे. पोलिसांना माहिती मिळाली की ती महिला त्या भागात येणार आहे, त्यानंतर त्यांनी तपास केला आणि तिला शोधून काढले.सविस्तर वाचा...
पुण्यातील जनसंवाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकार आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, सरकारविरुद्ध "हंबरडा मोर्चा" काढणाऱ्यांनी सत्तेत असताना समाजासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करावे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता पवार यांनी टीकास्त्र सोडले.सविस्तर वाचा...
पुण्यातील जनसंवाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकार आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, सरकारविरुद्ध "हंबरडा मोर्चा" काढणाऱ्यांनी सत्तेत असताना समाजासाठी काय केले याचे आत्मपरीक्षण करावे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता पवार यांनी टीकास्त्र सोडले.सविस्तर वाचा...
मुंबईमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कबूतरखान्याचा विषय चांगलाच पेटला आहे. आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या आत्मशांतीसाठी जैनसमाजाने आता राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असून, जैन मुनी नीलेशचंद्र यांनी 'शांतिदूत जनकल्याण पार्टी' या नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली .कबुतर" हे त्यांचे निवडणूक चिन्ह घोषित करून सरकारला उघड आव्हान दिले आहे
पुणे शहर गुन्हे शाखेने अफू विक्री करणाऱ्या एका इसमास अटक करून त्याच्याकडून 22 लाख 39 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 10 ऑक्टोबर 2025 रोजी लोणीकंद-वाघोली रोडवरील शिवरकर कॉम्प्लेक्स परिसरात करण्यात आली.सविस्तर वाचा...
दिवाळीपूर्वीच्या प्रथम सत्र परीक्षा शुक्रवारपासून सुरु होत आहे. त्यापूर्वीच काही शाळांमध्ये परीक्षा सुरु झाल्या आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत परीक्षा संपणार आहे. आता दिवाळीच्या सुट्ट्या विद्यार्थ्यांना लागणार आहे. यंदा 16 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहे. सविस्तर वाचा...
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे हे रविवारी वांद्रे येथील ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे त्यांचे चुलत भाऊ आणि शिवसेना (उबाठा ) प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ठाकरे कुटुंबातील संभाव्य युतीच्या चर्चेदरम्यान या भेटीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय उत्सुकता निर्माण झाली आहे.सविस्तर वाचा...
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीच्या खरेदीबाबत दिलेल्या विधानावरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान आता पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही या प्रकरणात सक्रिय झाले आहेत.सविस्तर वाचा...