गुरूवार, 20 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 ऑक्टोबर 2025 (15:29 IST)

16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत शाळांना दिवाळीची सुट्टी

school closed
दिवाळीपूर्वीच्या प्रथम सत्र परीक्षा शुक्रवारपासून सुरु होत आहे. त्यापूर्वीच काही शाळांमध्ये परीक्षा सुरु झाल्या आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत परीक्षा संपणार आहे. आता दिवाळीच्या सुट्ट्या विद्यार्थ्यांना लागणार आहे. यंदा 16 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहे. 
शेक्षणिक वर्षात वर्षातील 52 रविवारी शाळांना सुट्टी असते. तसेच सण-उत्सव जयंती निमित्त देखील शाळांना सुट्ट्या असतातच. यंदा जिल्हा परिषद, महापालिका आणि खासगी अनुदानित शाळांना 12 दिवसांची दिवाळीची सुट्टी मिळणार आहे. तर शॉक्षणिक वर्षाच्या अखेरीस 2 मे ते 13 जून च्या दरम्यान शाळांना सुट्ट्या असणार. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात द्वितीय सत्र परीक्षा सुरु होणार.
यंदा दरवर्षीपेक्षा कमी सुट्ट्या देण्यात आल्याने काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण याआधी ही सुट्टी जवळपास 21 दिवसांची म्हणजेच तीन आठवड्यांची दिली जात होती. यंदा फक्त 12 दिवस शाळांना सुट्टी असणार आहे. यंदा 16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात आली आहे 
दिवाळीपूर्वीची प्रथम सत्र परीक्षा ता. 10 ऑक्टोबर पासून सुरू होऊन 15 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्या नन्तर 16 ऑक्टोबर पासून दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहे. यामुळे पालिक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  28 ऑक्टोबर पासून शाळा पुन्हा सुरु होणार आहे. 
Edited By - Priya Dixit