गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (12:09 IST)

कन्हैय्या कुमार यांच्याविरूद्ध देशद्रोहाचा खटला, दिल्ली सरकारची मंजुरी

Treason case
कन्हैय्या कुमार याच्याविरूद्ध देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी दिल्ली सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशद्रोहाच्या प्रकरणात कन्हैया कुमार अडचणीत आला आहे. जेएनयूच्या एका कार्यक्रमात देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीआयचा नेता कन्हैया कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालवला जाणार आहे. दिल्ली सरकारने हा खटला चालवण्यास मंजुरी दिलीय. 
 
२०१६ मध्ये जेएनयू परिसरात देशविरोधी आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल करून वर्षाभरापूर्वीच आरोपपत्र दाखल केले होते.