शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान यांची उमेदवारी ठरली
येत्या मार्च महिन्यात राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि माजी मंत्री फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाणार आहे. महाराष्ट्राच्या कोट्यातील राज्यसभेच्या 7 जागा 2 एप्रिलला रिक्त होणार आहेत. यात महाविकासआघाडीला 4 जागा मिळणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वाटेला 2 जागा मिळणार आहे. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आता फौजिया खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
राज्यात महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर स्थानिक पातळीपासून राज्य पातळीवर राजकारण बदललं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आल्याने महाविकासआघाडीची ताकद वाढली आहे. त्यामुळे पवार आणि खान यांचा राज्यसभा निवडणुकीतील विजय सोपा आहे.