बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (17:07 IST)

शरद पवार यांनी 'या' शब्दात मांडली भूमिका

Sharad Pawar President of NC
राज्य ६० व्या वर्षांत आणि मी ८० व्या वर्षांत पदार्पण करतोय.  या वयात आपण थांबायचं, आता कसलं व्हिजन बघत बसायचं. व्हिजन बघण्यासंबधीचं काम नव्या पिढीकडे द्यायचं, आपण बघत राहायचं त्यांच्याकडे. काही अडचण आली, विचारलं तर सांगायचं. असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यातून राजकारण आणि समाजकारणातल्या नव्या भूमिकेचे संकेत दिले. 
 
लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यानही त्यांनी सक्रीय निवडणुका आता लढणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या बदलत्या व नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणं योग्य नाही. तर आता तरुणांना व्हिजन द्यायचं व ते काय करतात हे पाहायचं, ते करत असलेल्या कामात हस्तक्षेप करायचा नाही, असंही ते म्हणाले आहेत. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तरुणांना व्हिजन देत त्यांचं काम मी पाहत असतो, त्यांनी विचारलं तरच सल्ला देतो. कारण न विचारता सल्ला देणं व सतत कामांमध्ये हस्तक्षेप करणं योग्य नसतं, त्यामुळं तुमचा मान राहत नाही. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.