चलो अयोध्या , मुख्यमंत्री ७ मार्चला अयोध्येला जाणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात मार्च रोजी अयोध्येला जाणार आहेत. यावेळी ते रामलल्लाचे दर्शन घेतील, त्याचप्रमाणे शरयू नदीतीरावर आरती करतील अशी माहितीही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर दिली आहे. यावेळी हजारो शिवसैनिकही अयोध्येत जातील, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
चलो अयोध्या ..
7 मार्च
मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे
असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येत जाणार!
* दुपारी श्रीराम दर्शन
* संध्याकाळी शरयू आरती
ऐतिहासिक सोहोळ्यात सामील व्हा!!