गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

अयोध्येत चार महिन्यात गगनचुंबी राम मंदिर उभारणार: अमित शाह

अयोध्येत येत्या चार महिन्यात गगनचुंबी राम मंदिर उभारणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी रांचीतल्या जाहीर सभेत सांगितलं.
 
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह यांनी पाकुर आणि गोड्डा या दोन जिल्ह्यात सभा घेतल्या. त्यावेळी सभांमधून त्यांनी अयोध्या निकालावर भाष्य केलं.
 
दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं, राम मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येक घरातून एक एक वीट गोळा करणार आहोत. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.
 
"राम मंदिर काही केवळ मंदिर नसेल, तर राष्ट्रीय मंदिर असेल, जे भगवान रामाच्या जन्मस्थळी उभारलं जाईल. हे मंदिर रामाचा आत्मा असेल. हे मंदिर जगात भारताच्या लोकशाही आणि न्यायव्यवस्थेच्या कणखरपणाचा संदेश देईल," असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.