PMC बँक घोटाळा - ईडीकडून पहिलं आरोपपत्र दाखल
पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या पीएमएलए कोर्टात ईडीनं सात हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. मुख्य आरोपी आमि HDIL ग्रुपचे प्रमुख राकेश आणि सारंग वाधवान या पिता-पुत्रांविरोधात प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली आरोप लावण्यात आलेत.
पीएमसी बँकेतला घोटाळा समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं वाधवान पिता-पुत्रांना अटक केली होती.
ईडीनं घोटाळ्याची चौकशी सुरू केल्यानंतर पीएमसी बँकेत 6 हजार 700 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं. यात खातेदारांची जवळपास 73 टक्के रक्कम बुडाल्याचे उघड झाल्यानंतर आरबीआयनं पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आणि प्रशासकाची नेमणूक केली.