मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

आम्ही हिंदुत्ववादी, धर्मांतर केलं नाहीये - उद्धव ठाकरे

आम्ही आजही हिंदुत्ववादीच आहोत, धर्मांतर केलेलं नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. 
 
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये घेण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्या ते बोलत होते.
 
हिंदुत्त्वाचा बुरखा पांघरुन वावरणारी जी मंडळी आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
 
"मी मुख्यमंत्री नाही तर आज कुटुंबप्रमुख म्हणून भेटायला आलो आहे. जे शिवधनुष्य हाती घेतलं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या साथीने पेललं आहे. आव्हान मोठं आहे, मात्र छोटी आव्हानं आपण स्वीकारत नसतो," असं उद्धव ठाकरे म्हणाले.