महिला अत्याचारांविरोधात तातडीने कारवाई करा- उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.
गुन्हेगारांना वचक बसेल असं काम करण्यासाठी महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ आणि जलद कार्यवाही करावी, असंही उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
निर्भया फंडचा विनियोग तात्काळ कसा करता येईल याची कार्यपद्धती तयार करा, असेही आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नागपूर अधिवेशनामध्ये सरकार अस्थिर होण्याचा आजवरचा इतिहास आहे. बॅ. अंतुले, बाबासाहेब भोसले, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी आणि विलासराव देशमुख या मुख्यमंत्र्यांची खुर्ची नागपूर अधिवेशवनानंतर थोड्याच दिवसांमध्ये गेली होती. शरद पवार यांच्याविरोधात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, रामराव आदिक यांनी केलेल्या बंडाची सुरुवात हिवाळी अधिवेशनातच झाली होती.
उद्धव ठाकरे यांच्यासह सध्या महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ केवळ सात जणांचे असून सर्व मंत्री बिनखात्याचे आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजप प्रयत्न करेल, अशी बातमी लोकसत्ताने दिली आहे.