गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (18:30 IST)

उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर, गृह मंत्रालय शिवसेनेकडे

महाविकास आघाडी सरकारमधील खातेवाटप जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत शपथ घेतल्या सहा मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं आहे.
 
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह खातं सोपविण्यात आलं आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे नगरविकास, पर्यावरण-वने, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम ही खातीही सोपविण्यात आली आहेत. सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग आणि परिवहन मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्रिपद सोपविण्यात आलं आहे, तर छगन भुजबळांकडे जलसंपदा तसंच ग्रामविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
 
काँग्रेसच्या वाट्याला महसूल मंत्रिपद तसंच सार्वजनिक बांधकाम, महिला व बालविकास ही खाती आली आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपद तसंच ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण ही खाती देण्यात आली आहेत. नितीन राऊत यांना सार्वजनिक बांधकाम, महिला व बालविकास खातं सोपविण्यात आलं आहे.