मुख्यमंत्री येत्या ७ मार्च रोजी अयोध्येला जाणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या ७ मार्च रोजी अयोध्येत जाणार असल्याची माहिती, शिवसेनेचे नेते खासदार संदय राऊत यांनी दिली. याआधी “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार याबाबात घोषणा झाली होती.
सरकारला १०० दिवस झाल्यानंतर ते जातील असं म्हटलं होतं. परंतु आता ७ मार्चला ते अयोध्येला जातील. या ठिकाणी ते राम लल्लाचं दर्शन घेतील. तसंच शरयू तीरावर आरतीही करतील,” अशी माहिती राऊत यांनी दिली. यावेळी हजारो शिवसैनिकही अयोध्येत जातील, असंही त्यांनी नमूद केलं. “हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. त्याचं कोणीही राजकारण करू नये. राजकीय दृष्टीनं याकडे पाहू नये,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.