मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 23 जानेवारी 2020 (13:57 IST)

सरकारला 100 दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री अयोध्येला जाणार : राऊत

Chief Minister to go to Ayodhya after 100 days completes: Raut
राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील असे शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. 
 
राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच, आणि त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारामुळे मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला होता. ते कधी अयोध्येला जातील याबाबत अनिश्चितता होती. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळाचे काम मार्गी लागल्यानंतर मुख्यमंत्री अयोध्या दौर्‍याला निघतील अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र ते नेमके केव्हा अयोध्या दौर्‍यावर जातील हे गुलदस्त्यातच होते. राऊत यांच्या ट्विटमुळे दौर्‍याची नेमकी तारीख स्पष्ट झाली नसली, तरी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर ठाकरे केव्हाही दौरा आोजित करू शकतात. 
 
चलो अयोध्या, असा नारा देत खासदार राऊत यांनी हे वृत्त दिले आहे. अयोध्या दौर्‍याबाबत सांगत असताना राऊत यांनी सरकारच्या कामकाजावरही भाष्य केले आहे.