शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 21 जानेवारी 2020 (11:11 IST)

सुरतच्या मार्केटमध्ये भीषण आग

गुजरातच्या सुरत शहरातील रघुवीर मार्केटमधील एका दहा मजली इमारतीला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. विझवण्यासाठी तब्बल 40 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. 
 
सुरत हे देशातील प्रसिद्ध व्यापारी शहर आहे. याठिकाणी कपड्यांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. अशाच तयार कपड्यांची दुकाने असलेल्या रघुवीर मार्केटमधील एका दहा मजली इमारतीला आज भीषण आग लागली. यामध्ये अनेक कपड्यांची दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे कळते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले.