गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 20 जानेवारी 2020 (13:09 IST)

काश्मीरमध्ये इंटरनेटवर डर्टी पिक्चर बघतात

काश्मीरमध्ये घाणेरडे सिनेमे पाहण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो, असे खळबळजनक वक्तव्य नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी केले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात राहावी, म्हणून काश्मीरमधील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. ही इंटरनेट सेवा हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच व्ही. के. सारस्वत यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्ता आहे.
 
नेते काश्मीरमध्ये कशासाठी का जाऊ इच्छितात?, असा सवाल उपस्थित करत, राजधानी दिल्लीच्या  रस्त्यांवर ज्याप्रमाणे आंदोलने सुरू आहेत. तशीच आंदोलने त्यांना काश्मीरमध्ये घडवून आणायची आहेत, असा दावा सारस्वत यांनी यावेळी केला. आंदोलनाचे लोण पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या
प्रमाणावर वापर केला जातो.