मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दोन मुलंच जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा

देशात दोन मुलंच जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा येणं आवश्यक आहे असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या ठिकाणी झालेल्या संघाच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केल आहे. 
 
सध्या देशातली लोकसंख्या वाढ हा चिंतेचा विषय आहे त्यासाठी दोन मुलंच जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा असं प्रतिपादनही मोहन भागवत यांनी केलं. अशा प्रकारच्या कायदा आणल्यास लोकसंख्या नियंत्रणात येईल असंही मोहन भागवत म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता देशात दोन मुलं जन्माला घालण्याच्या कायद्यासाठी आग्रही असेल. तसंच देशात यासंबंधी जनजागृती मोहीम राबवेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
यावेळी CAA अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्यावरही सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतप्रदर्शन केलं. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागे हटण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं आहे.