सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 जानेवारी 2020 (16:27 IST)

'या' विनंतीवर निर्भयाची आई भडकली

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा न देता माफ करावं, अशी विनंती ज्येष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईकडे केली आहे. त्यांच्या या विनंतीवर निर्भयाची आई भडकली आहे.
 
“मी निर्भयाच्या आईच्या दु:खाला समजू शकते. मात्र, आरोपींच्या मृत्यूदंडाला माझा विरोध आहे. मी निर्भयाच्या आईला विनंती करते की, त्यांनी सोनिया गांधी यांच्यासारखं आरोपींना फाशीची शिक्षा देऊ नये. सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफ केले होते. त्याप्रमाणे निर्भयाच्या आईनेदेखील आरोपींना माफ करावे”, अशी विनंती इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईकडे केली. त्यांच्या या विनंतीला निर्भयाच्या आईने सडेतोड प्रत्युत्तर दिले.