1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (10:18 IST)

चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करायला 10-12 वर्ष लागेल : शरद पवार

Chandrakant Patil
"देशाचं भवितव्य घडवण्याची युवकांमध्ये ताकद आहे. त्यामुळे तरुणांना संधी मिळाली पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की कॉलेजमध्ये पुन्हा निवडणुका सुरु करायला हव्या. त्यामुळे कॉलेज तरुणांना संधी मिळेल," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.
 
मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने 'संवाद साहेबांशी' हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मार्गदर्शनपर मुलाखत घेण्यात आली.
 
यावेळी शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला. "चंद्रकांत दादांना माझ्यावर पीएचडी करायची असेल, तर त्यांना 10 ते 12 वर्षे वेळ काढावा लागेल," असं शरद पवार म्हणाले.