शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (18:02 IST)

महाराष्ट्रात NPR प्रक्रिया थांबवणार नाही: उद्धव ठाकरे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले की ते महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) प्रक्रिया थांबवणार नाही. तरी त्यांनी राज्यात NRC लागू होऊ देणार नाही हे देखील स्पष्ट केले आहे.
 
ठाकरे यांनी एनपीआरचे सर्व कॉलम स्वत: तपासतील असे आश्वासन देखील दिले आहे. त्यांनी म्हटले की एनपीआर तयार करण्याच्या प्रक्रियेत राज्यात कुठलीही समस्या येणार नाही.
 
ठाकरे यांनी ट्वीट केले आहे की सीएए आणि एनआरसी वेगवेगळे आहे आणि एनपीआर वेगळं. जर सीएए लागू झालं तर कुणालाही काळजी करण्यासारखं काहीही नाही. एनआरसी सध्या नसून राज्यात लागू देखील होणार नाही. त्यांनी म्हटले की एनपीआर राज्यात लागू केलं जाईल कारण त्यात काहीही वादग्रस्त नाही.
 
ठाकरे यांनी म्हटले की राज्यात NRC लागू होऊ देणार नाही. त्यांनी म्हटले की जर एनआरसी लागू झालं तर याने हिंदू आणि मुस्लिमच नव्हे तर आदिवासीदेखील प्रभावित होतील. एनपीआर जनगणना आहे आणि यामुळे कोणीही प्रभावित होईल असे वाटत नाही कारण हे दर दहा वर्षात होतं.