शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (12:55 IST)

इंदुरीकर महाराजांची जाहीर माफी, वाचा पत्र

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. त्यांनी पत्रात लिहिले कीमहाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, किर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील व मातासमान असलेला तमाम महिलावर्ग.
 
आज गत आठ दिवसांपासून माझ्या किर्तणरूपी सेवेतील ज्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियासह इतर समाजमाध्यमांत माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे.
 
तरी मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून, मी माझ्या २६ वर्षांच्या किर्तनरूपी सेवेत समाज प्रबोधन, समाज संघटन, अंधश्रद्धा निर्मूलन व विविध जाचक रूढी-परंपरा यावर भर दिला होता. माझ्या किर्तनरूपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धींगत व्यावे ही सदिच्छा!
 
असं पत्रक इंदुरीकर महाराज यांनी काढलं असून त्यावर इंदुरीकर महाराजांची स्वाक्षरी आहे.
 
महाराजंनी ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यासंदर्भात सोशल मीडियावर टीका झाली असून वाद निर्माण होत असल्याने इंदुरीकर महाराजांनी माफीनाम काढून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.