बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 2 डिसेंबर 2019 (10:44 IST)

अभिनेत्री पामेला एंडरसनचे मोदींना पत्र

दिल्लीतील हवेच्या प्रदुषणाचा तेथील प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत हॉलिवूड अभिनेत्री पामेला एंडरसनने नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. या पत्राद्वारे तिने शाकाहारी आहारास प्राधान्य देण्याची विनंती पंतप्रधान मोदींकडे केली आहे. ‘पेटा’ (People for the Ethical Treatment of Animals)द्वारे तिने हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले. 
 
अभिनेत्री पामेला एंडरसनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्व सार्वजनिक बैठक किंवा कार्यक्रमांमध्ये फक्त शाकाहरी आहाराचा समावेश करण्यात यावा असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. सध्या दिल्लीत हवेतील प्रदूषणाने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हवामानात सतत होणाऱ्या बदलांच्या विरोधात भारताच्या लढाईचे नेतृत्व करण्यासाठी सरकारी बैठका आणि कार्यक्रमांमध्ये केवळ शाकाहारी भोजन देण्याचे आवाहन तिने केले. या पत्रात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आग्रह करताना म्हटले आहे की, ‘मी तुम्हाला आग्रह करते, तुम्ही देखील दाखवून द्या की अन्य देशांच्या तुलनेत भारत देश त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.’ मांस, अंडे, डेअरी यांसाठी प्रण्यांचं संरक्षण करणं फार महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितले आहे.