1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 31 जानेवारी 2020 (16:35 IST)

मनसेचा विद्युत नियामक आयोगाला सवाल, पाठविले पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पत्र पाठवलं आहे. या पत्रात बेस्ट वीज विभागाचा नफा परिवहनला का देता? असा प्रश्न विचारला आहे. तसंच परिवहन विभागाबाबत सरकार उदासिन असल्याची टिपणी देखील या पत्रात केली गेली आहे.

बेस्ट परिवहनचा तोटा पालिकेने भरावा नफा परिवहनला देऊ नये असे आदेश देण्याची मागणी या पत्रातून राज ठाकरे यांनी केली आहे. बेस्ट उपक्रम गेले कित्येक वर्षे विद्युत पुरवठा विभागास होणार भरघोस नफा हा कायमस्वरुपी तोट्यात असणाऱ्या परिवहन विभागाकडे वळत करीत आहे. हे विद्युत कायदा २००३ चे बेस्टकडून उल्लंघन झाल्याचं या पत्रात म्हटलं आहे.