शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बेळगाव , सोमवार, 20 जानेवारी 2020 (12:28 IST)

सीमाप्रश्न म्हणजे दोन्ही बाजूने पांडव : संजय राऊत

कानडी बांधव राज्यात जिथे राहतात, तिथे कानडी शाळांना आमचे सरकार अनुदान देते. भाषांमध्ये वाद असू नये, कारण आपला देश एक आहे. आमच्या मनात खोट नाही, सर्वच आपले आहेत. सीमाप्रश्न म्हणजे काही कौरव पांडवाचे युद्ध नाही. या ठिकाणी दोन्ही बाजूने पांडव आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेते संज राऊत यांनी आपले रोखठोक विचार मांडले. राऊत हे कर्नाटक दौर्‍यावर असून त्यांची एक प्रकट मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या मुलाखतील त्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली.
 
कर्नाटकातील अनेक कलावंत, साहित्यिक यांचे महाराष्ट्रातील साहित्यामध्ये मोठे योगदान आहे. संजय राऊत यांनी गिरीश कर्नाड, भीमसेन जोशी पंडित, अभिनेते रजनीकांत यांचा आवर्जून उल्लेख केला. बेळगावमध्ये मराठी भाषेची मशाल पेटलेली आहे. बेळगावमध्येच नाही तर महाराष्ट्रातही मराठीसाठी लढावे लागते. भाषे-भाषेमध्ये वाद असायला नको, कारण देश एक आहे. मुंबई, सोलापूरसह इतर महाराष्ट्रतील जिल्ह्यातील कानडी भाषेंच्या शाळांना अनुदान देण्याचे काम आम्ही करतो. ज्या महानगर पालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे. तेथील कन्नड शाळा टिकावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 
 
संजय राऊत यांनी एका मुलाखतीत विविध विषयांवर आपले मते व्यक्त केली. उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय मतभेद, मात्र कौटुंबिक नाते अजूनही कायम आहे. शिवसेनेप्रुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रेम केले नसते तर देशाला संजय राऊत दिसला नसता, असेही ते एका प्रश्नावर बोलताना म्हणाले. वृत्तपत्रांमध्ये क्रांती करण्याची तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये उलथापालथ करण्याची ताकद आहे, असेही ते म्हणाले.