रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (08:14 IST)

उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद द्या, चाहत्यांने रक्ताने लिहिले पत्र

माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रिपद द्या, अशी मागणी एका चाहत्याने रक्ताने पत्र लिहून केली  आहे. निलेश जाधव असे या चाहत्याचे नाव आहे. या तरुणाने गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून उदयनराजेंना मंत्रिपद द्या अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे 10 फेब्रुवारीला निलेशचा वाढदिवस होता.  
 
“मी निलेश सुर्यकांत जाधव सांगू इच्छितो की, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (महाराज साहेब) यांना राज्यसभेवर खासदार करुन मंत्रीपद मिळावे आणि छत्रपतींच्या गादीचा सन्मान करावा अशी विनंती करतो,” असे  निलेशने या पत्रात लिहिले आहे.