शनिवार, 12 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (12:37 IST)

सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत पीडितेला श्रद्धांजली

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू  झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकिकडे आरोपी विक्की नगराळे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे  खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त करत पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी, अशी विनंती केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत पीडितेला श्रद्धांजली वाहली .
 
“अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय. पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत”.