गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: आळंदी , सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (16:02 IST)

सत्तेत असो वा नसो, सन्मार्ग सोडता कामा नये : देवेंद्र फडणवीस

आपण सत्तेत असो किंवा सत्तेच्या बाहेर असो, सन्मेगो सोडता कामा नये, असे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीमध्ये म्हटले आहे. सन्मार्गवर राहायचे असेल तर सन्मार्गवर चालण्याचे टॉनिक मिळते, त्यामुळे ते टॉनिक घेण्यासाठी मी या कार्यक्रमाला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. स्वानंद सुखनिवासी सद्‌गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाप्रसंगी बोलत होते.
 
फडणवीस म्हणाले, ढोक महाराज यांनी सांगितले राजकारणात कमी अधिक होत असते. सत्तेतले सत्तेच्या बाहेर जातात तर कधी बाहेरचे सत्तेत येतात. पण, माझे एक मत नेहमी असते, आपण सत्तेत असो की सत्तेच्या बाहेर असो, सन्मार्ग सोडता कामा नये. तसेच, लोकांचा आशीर्वाद असेल तर तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. असे म्हणत लोकांचा आशीर्वाद असला की आपण येतोच आणि येतोच, असेही त्यांनी  ठामपणे सांगितले. 
 
मी माझ्या जीवनात कधीही सत्कार स्वीकारत नाही. मी अनेक काम केली असतील पण सत्काराला नाही म्हणतो. याबद्दल माझे नेहमी असे मत आहे की, सत्कार तेव्हाच स्वीकारायला पाहिजे जेव्हा आपण सत्कार्य करतो आणि आपल्या जीवनामध्ये केलेले कार्य हे कर्तव्य आहे. कर्तव्याचा सत्कार होऊ शकत 
नाही. ज्यादिवशी खर्‍या अर्थाने सत्कार्य आपल्या हाताने होईल त्या दिवशी सत्कार स्वीकारला पाहिजे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.