बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जानेवारी 2020 (10:55 IST)

महाराष्ट्रातील सत्ताप्रयोग देशभर राबवण्यासाठी पुढाकार - शरद पवार

महाराष्ट्रासारखाच सत्तप्रयोग देशातील इतर राज्यांमध्येही भाजपच्या विरोधात राबवण्यासाठी आपण पुढाकर घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगरमध्ये म्हणाले.
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं आपल्याला पत्र मिळालं असून, राष्ट्रीय स्तरावर पुढाकार घेण्यास आणि त्यासंबंधी बैठक बोलावण्यास त्यांनी सांगितल्याचं पवारांनी म्हटलं.
 
"लोकांना पर्याय हवाय. देशात आणि राज्यात एकच पक्ष अशी स्थिती बरी नाही, असं लोकांना वाटतं. त्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या प्रयोगाकडे पाहिलं जातंय. समान कार्यक्रमावर पक्ष एकत्र येऊन नवा पर्याय देऊ शकतील, असा विश्वास महाराष्ट्रानंतर जाणकारांना वाटतंय," असं शरद पवार म्हणाले.
 
दरम्यान, महाविकास आघाडीत कुणाला कुठलं खातं द्यायचं, याचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच झाल्याचा दावा पवारांनी केला. खातेवाटपावरुन नाराजी असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळलं.